kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

तोच धाक, तोच रुबाब! सुनेत्रा पवारांच्या रुद्रावताराने झाली अजित पवारांची आठवण, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आता राज्याच्या राजकारणात चांगल्याच सक्रिय झाल्या आहेत. राज्यकारा हाकत असताना निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग पाहायला मिळत आहे. तसेच आता त्या त्यांच्या बारामती या मतदारसंघाकडेही विशेष लक्ष देत आहेत. नुकतेच सुनेत्रा पवार यांची प्रशासनावर असलेली पकड आणि स्वच्छतेप्रती असलेली तळमळ याची प्रचिती पाहायला मिळाली. सुनेत्रा पवार यांनी रविवारी म्हणजेच 7 जून रोजी बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयाला अचानक भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी रुग्णालयाचे काम, स्वच्छता तसेच इतर बाबींची पाहणी केली. रुग्णालयातील काही गोष्टींवर बेट ठेवत त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांनाही चांगलंच झापलं आहे. अजित पवारांची प्रशासनावर प्रचंड पकड होती. अधिकाऱ्यांना ते छापायला मागे पुढे पाहायचे नाहीत. मग ते कार्यालय असो की त्यांचा जनता दरबार. सकाळीच ते कामाला ही लागत होते. त्यांचा प्रचंड धाक होता. त्यामुळे अधिकारी कर्मचारी त्यांना टरकून होते. जे काय असेल ते समोरा समोर असा अजित पवारांचा स्वभाव होता. त्यांच्या या स्वभावाची आठवण आज चक्क सुनेत्रा पवारांच्या रुपाने दिसून आली. त्यांनी ही बारामतीच्या एका रुग्णालयात भेट दिली. त्यावेळी त्यांनी तिथल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली. त्यांचा अवतार पाहून सर्वांनाच अजित पवारांची आठवण झाली. सुनेत्रा पवारांचा अधिकाऱ्यांना झापतानाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *