19 डिसेंबर यायला आता अवघे तीन दिवस उरले आहेत. अमेरिकेत यादिवशी काही कागदपत्रं समोर येतील आणि जगभरात खळबळ उडेल. अनेक राजकीय नेत्यांचे स्टींग ऑपरेशन समोर येईल. या उलथापालथीचा भारतावरही परिणाम होईल. कदाचित भारताचा पंतप्रधान बदलेल. मराठी माणूस पंतप्रधानपदी असेल असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
या वर्षभरात राजकारणात बरचे काही घडले आहे. विधानसभांच्या निवडणूकमध्ये आतिआत्मविश्वासाचा आम्हाला फटका बसला अशी प्रांजळ कबुली चव्हाण यांनी दिली. पण याचवेळी अनेक जणांनी काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधले असा चिमटा देखील काढायला पृथ्वीराज चव्हाण विसरले नाहीत.
आणखी काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण ?
राहुल गांधीनी बोगस मतदानाचा मोठा मुद्दा हाती घेतला आहे. निवडणूक आयोगाची विश्वासार्हता कमी झाली आहे. ओबीसी मराठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिथं करता येईल तिथं भाजपने पोलराईस केले. पराभूत झालेल्या उमेदवारांना सांगितले की याचिका दाखल करा. आम्ही याचिका दाखल केलेल्या आहेत त्यांची सुनावणी सुरू आहे. मी पण याचिका दाखल केलेली आहे. आमच्या मतदार मध्ये बोगस मतदान नोंदणी केलेली आहे. कॉंग्रेस पक्षाचे २८८ मतदार संघातील माहिती गोळा केलेली आहे. निवडणूक निकाल लागला की सर्वच म्हणतात माझ्यावर अन्याय झाला. निवडणूक आयोगाने योग्य काम केले पाहिजे. निवडणूक यादी मध्ये एका माणसाला एकाच ठिकाणी मतदान करु शकतो. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस मतदान कसं काय होऊ शकते असा सवाल त्यांनी केला.
माझ्या मतदार संघात १२ हजार बोगस मतदार आहेत. निवडणूक आयोगाची ही जबाबदारी आहे की मतदार यादी स्पष्ट असली पाहिजे. मला पाठीमागच्या निवडणुकीपेक्षा जास्त मतं पडली मग तरी पराभव कसा झाला. निवडणूक आयोगाला यावर उपाय करणं शक्य आहे पण ते करत नाही कारण त्यांना सत्ताधारी पक्षाला लाभ मिळवून द्यायचा आहे, असा आरोपही त्यांनी केला.
हे जे काय चाललंय याला भाजपाचे केंद्रीय नेतृत्व जबाबदार आहे. नरेंद्र मोदी याला जबाबदार आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे पण तो बाहेर काढायला आम्ही कमी पडतं आहोत. त्यांना पाश्ववी मतदान मिळालं आहे. पण आम्ही भांडत आहोत. आपल्या महाराष्ट्रात एक ही मोठा प्रकल्प येत नाही यांना लाज वाटली पाहिजे. सरकार हे झोपलेलं आहे हे सरकार कमीशनचे सरकार सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या बेरोजगार सध्या सुरू आहे.विरोधक म्हणून आम्ही कमी पडतोय कारण आमचे संख्याबळ कमी आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
मी ते बोललो त्यामुळे कुतुहल निर्माण झाले आहे. मी ते का बोललो त्यांचे स्पष्टीकरण दिले आहे. 19 डिसेंबर महत्वाचे आहे तो पर्यंत पाहु आपण काय होतोय ते, असे चव्हाण म्हणाले. बाहेरून अणुभट्ट्या मागवायचा निर्णय सरकारने निर्णय घेतला आहे. २००८ पासून परदेशी कंपन्या भारतात आल्या नव्हत्या. अदाणीला या क्षेत्रात प्रवेश द्यायचा असा सरकारने निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की आम्ही अणुचाचण्या करणार. त्यांनी केल्या म्हटल्यावर रशिया करणार पण भारत पण करणार पण आम्ही त्याला विरोध करणार असे त्यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तान सोबत सुरू केलेले युद्ध मोठी घोडचूक होती असे वक्तव्यही चव्हाण यांनी केले. आपली पाकिस्तान पेक्षा १० पट मोठी अर्थव्यवस्था आहे. मोदी यांनी युद्ध थांबवायचं का मान्य केले. युद्धाच्या पहिल्याच दिवशी आपला पराभव झाला, असा खळबळजनक दावा त्यांनी केला. मोदींवर कसला दबाव आहे ते उत्तर आपण शोधले पाहिजे. मोदींवर अमेरिकाचा दबाव आहे. परराष्ट्र धोरणामध्ये आपण मागे आहोत. परराष्ट्र धोरणामध्ये आपल्याला अपयश आल्याचा आरोप त्यांनी केला.














