पश्चिम बंगालमध्ये भाजपला ऐतिहासिक विजय मिळवून देणारे शुभेंदू अधिकारी हे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. बंगालच्या इतिहासात भाजपचा पहिला मुख्यमंत्री आज विराजमान होणार आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय.
संजय राऊत म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाने अत्यंत भ्रष्ट अशा व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी बसवण्याची आपली परंपरा कायम राखली आहे. 2020 च्या दरम्यान एक स्टिंग ऑपरेशन झाले होते आणि तृणमूल काँग्रेसच्या पाच खासदारांना ऑन कॅमेरा पैसे स्वीकारताना दाखवण्यात आले. त्यात शुभेंदू अधिकारी होते. त्यानंतर शुभेंदू अधिकारी यांच्यावर ईडीच्या आणि अँटी करप्शनच्या धाडी केंद्राने टाकल्या. त्या धाडी टाकायला सुरुवात झाल्यावर शुभेंदू अधिकारी हे भाजपमध्ये सामील झाले आणि आज ते मुख्यमंत्री झाले. शुभेंदू अधिकारी हे अजूनही वॉशिंग मशीनमध्येच फिरत आहेत. तो डाग अजूनही स्वच्छ झालेला नाही. पण, अशा माणसाला मुख्यमंत्रीपद देऊन भाजपने भ्रष्टाचारांना सत्ता देण्याची आपली परंपरा राखली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन”
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने 254 एकर जमीन दोन बिल्डर्सला दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. बिल्डर्सला दिलेली जमीन काहीही करून काहीही करून परत ताब्यात मिळावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. मीरा रियल इस्टेट, स्टेट इन्वेस्टमेंटचे मालक कोण आहेत? असा प्रश्न देखील राऊत यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्र सरकारकडे मोठमोठे वकील आहेत, तरीदेखील सरकारने खटला हरला. सरकार मुद्दामून हरलं का? असा संशय देखील त्यांनी व्यक्त केला आहे. संजय राऊत म्हणाले की, मीरा भाईंदरमध्ये २५४ एकर सरकारी जमीन देण्यात आली. कोट्यावधीची जमीन उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे खाजगी व्यक्तीला देण्यात आली. सरकारने आव्हान देण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्र सरकारकडे एवढे मोठे वकील असताना हा खटला हरले कसे? ज्यांच्या बाजूने निकाल दिला ते मीरा रियल इस्टेट आणि स्टेट इन्वेस्टमेंटचे मालक कोण? असा निर्णय मंत्र्यांनी घेतला असता तर हाय कोर्टने व्यवहार पारदर्शक नाही असे म्हटले असते. मंत्र्यांची नोकरी गेली असती.
हायकोर्टने ही जमीन मोफत बिल्डरला दिली. ही महाराष्ट्राची जमीन आहे. ही जमीन काही करून परत मिळवा. हा बिल्डर कोण? कोणी प्रयत्न केले हे बावनकुळे यांनी समोर आणावे. काल त्यांनी आव्हान देणार असल्याचे सांगितले. पण ही जमीन आंदण देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचा कोर्टात पराभव झाला हे जाणून बुजून हरले का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.













Leave a Reply