ईशा डे हिने लग्नगाठ बांधली असून तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे तिच्या लाल भडक साडीतील ब्रायडल लूकने चाहत्यांचे मन जिंकले आहे. पेस्टल रंगाच्या ट्रेंडमध्ये तिने लाल रंगाच्या साडीची निवड केली. ईशा डेच्या लग्नाचे फोटो समोर येताच तिच्या चाहत्यांनी आणि मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तिच्या साध्या पण आकर्षक नवरीच्या लूकमुळे हा विवाहसोहळा विशेष चर्चेत आला आहे.वनिता खराताने तिच्या सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत.
लग्नाच्या खास दिवशी ईशा डे हिने अतिशय पारंपरिक आणि आकर्षक ब्रायडल लूक कॅरी केला होता. लाल भडक साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. या साडीवर केलेले नाजूक डिझाईन आणि पारंपरिक पद्धतीने नेसलेली साडी तिच्या लूकला अधिक उठावदार बनवत होती.
ईशा डेने या साडीवर पारंपरिक दागिने घातले होते. गळ्यात सुंदर नेकलेस, नाकात नथ, कपाळावर टिकली आणि हातात हिरव्या बांगड्या अशा दागिन्यांनी तिचा नवरीचा लूक पूर्ण झाला होता. यासोबत तिने मिनिमल मेकअप आणि हलका आयमेकअप केला होता, ज्यामुळे तिचे नैसर्गिक सौंदर्य आणखी खुलून दिसत होते.













