kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

विश्वरत्न फाउंडेशनच्या वतीने आंबेगाव खुर्द येथे माता रमाई आंबेडकर जयंती साजरी

आंबेगाव खुर्द येथे विश्वरत्न फाउंडेशनच्या वतीने माता रमाई आंबेडकर यांची १२८ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर जाधव यांनी केले. अध्यक्षस्थानी शुभ्रा कांबळे होत्या.

कार्यक्रमात ॲड. रवी विष्णू पाटील यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले. माता रमाई आंबेडकर यांच्या त्यागमय जीवनातून समाजाला प्रेरणा मिळते, असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी अस्मिता पारखे यांनी माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर भाषण करत त्यांच्या संघर्ष, संयम व त्यागाच्या आठवणी उपस्थितांसमोर मांडल्या. पाटोळे ताईंनी गीत सादर केले, तर स्वप्नाली गाडे, चेतना आणि शरण्या भोळे यांनी बाबासाहेब व मातांवर आधारित गीते सादर करून व भाषण करून कार्यक्रमात रंग भरला.

विश्वरत्न फाउंडेशनचे संस्थापक नरेंद्र पारखे यांनी माता रमाई यांच्या विचारांचा वारसा समाजापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास रूपाली ओव्हाळ, किर्ती खडसे, करुणा जाधव लक्ष्मी शेंडगे, आम्रपाली भोळे, प्रियंका कांबळे, मंगल पाटोळे, रेश्मा गाडे, नीलिमा शेलार, राधिका शेलार, अलका भापकर, जयश्री चव्हाण, मनीषा गोगावले, रुकसाना मुल्ला, मयुरी खिराडकर, रेखा वाघमोडे तसेच प्रभाकर शेंडगे, सुनील कांबळे, ओमकार पारखे, धवल पारखे, सुभाष खडसे, नितीन ओव्हाळ, रवी जाधव आदी उपस्थित होते.