kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

Bigg Boss 19 च्या घरातून एक नव्हे दोन स्पर्धकांना बाहेरचा रस्ता! तीन आठवड्यानंतर पहिलंच एव्हिक्शन

Bigg Boss 19 घरात तिसऱ्या आठवड्याचा ‘वीकेंड का वार’ धक्कादायक ठरला. या आठवड्यात एक नव्हे तर 2 स्पर्धकांना बाहेर काढण्यात आले. तीन आठवड्यात पहिल्यांदाच या घरातून स्पर्धकांचे एव्हिक्शन झाले असून पोलिश अभिनेत्री नतालिया जानोस्झेक आणि सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर नगमा मिरजकर या दोघी या पर्वातून बाहेर जाण्याच्या पहिल्या दोन स्पर्धक ठरल्या. र नतालियाने या घरातील विविध टास्कमध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला होता, पण हिंदी बोलताना भाषेची अडचण एक मोठा अडथळा ठरली. तर नगमा सर्व स्पर्धकांमध्ये सहभागी होऊन टास्क करण्याबाबत किंवा एखादा मुद्दा उचलून धरण्यात अपयशी ठरली. याबाबत तिला वारंवार आठवण करुन दिली जात होती.

नगमा आणि नतालिया घराबाहेर पडल्या असल्या तरी यामुळे घरातील दोन सदस्यांना सर्वाधिक दु:ख झाले. नगमाचा बॉयफ्रेंड अवेज दरबार आणि नतालियासोबत ज्याचे सूर जुळत होते असा मृदुल तिवारी, या दोघांसाठीही हे एलिमिनेशन सर्वात कठीण होते. अवेजने या घरातच नगमाला नॅशनल टीव्हीवर प्रपोज केले होते. तर मृदूलने नतालियाकडून सालसा आणि इंग्रजीचे धडे घेतले होते. त्यामुळे त्यांच्यातील केमिस्ट्री चांगलीच लोकप्रिय झालेली. आता नगमा आणि नतालिया दोघी घराबाहेर गेल्याने, BB19 च्या या पर्वात कोणत्या कपलवर लक्ष केंद्रित केले जाईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दरम्यान हा ‘वीकेंड का वार’ जरा वेगळा होता. तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी सलमान खान प्रेक्षकांच्या भेटीला आला नाही. तर होस्टिंगची धुरा फराह खानने सांभाळली होती आणि तिने सर्वच स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. फराहनेच घोषित केले की, या आठवड्यात डबल एव्हिक्शन होणार आहे. यावेळी नगमा, अवेज, नतालिया आणि मृदूल हे स्पर्धक नॉमिनेट झाले होते, त्यांच्यापैकी दोन्ही मुली घराबाहेर गेल्या. या भागांमध्ये अक्षय कुमार आणि अर्शद वारसीदेखील त्यांच्या ‘जॉली LLB 3’ या चित्रपटाच्या निमित्ताने सहभागी झाले होते.

नगमा आणि नतालिया या दोघी शोमधून बाहेर पडल्यानंतर, लवकरच दोन वाइल्ड-कार्ड स्पर्धक शोमध्ये प्रवेश करतील अशी अपेक्षा आहे. इंडिया फोरम्सने दिलेल्या वृत्तानुसार, टिया आणि शिखा सलमान खानच्या शोमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री करणार आहेत.