kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

पुण्यातील काँग्रेस भवन परिसरातील आंदोलन भोवले

काँग्रेस भवन परिसरात रविवारी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. दगडफेकीची घटना घडल्यानंतर या प्रकरणी भारतीय जनता पक्षासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी परस्पर विरोधी फिर्यादी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल केल्या. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष नगरसेवक धीरज घाटे, तसेच काँग्रेसचे पदाधिकारी नगरसेवक अरविंद शिंदे यांच्यासह १०० ते १५० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

महापौरांचे नाव FIR मधून का वगळले? पोलिसांना जाब विचारण्यासाठी काँग्रेस काढणार मोर्चा

पुण्यात रविवारी झालेल्या भाजपच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आता राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांनी भाजपवर राजकीय दहशतवाद माजवल्याचा आरोप केला. मुख्य रस्ता २ तास अडवून धरला असतानाही पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना रोखले नाही. हापौरांनी प्रक्षोभक भाषण करूनही त्यांचे नाव FIR मधून वगळण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळेच हे घडले का? असा सवाल काँग्रेसने विचारला आहे. या विरोधात काँग्रेस पुणे पोलीस आयुक्तालयावर मोर्चा’ काढणार असून सर्व पुराव्यासह मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.