kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

दुःखद बातमी ! लोकमान्य टिळकांचे पणतू ,‘केसरी’चे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांचे निधन

एक दुःखद बातमी समोर येत आहे. पुण्यात लोकमान्य टिळकांचे पणतू आणि केसरी वृत्तपत्राचे संपादक दिपक टिळक यांचं निधन झाले आहे. पुण्यातील राहत्या घरी अल्पशा आजाराने वयाच्या ७४ व्य वर्षी दिपक टिळक यांचं निधन झाले आहे. दिपक टिळक हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती देखील होते. त्याचबरोबर अनेक संस्थांचे ते विश्वस्त होते. त्यांच्या मागे मुलगा डॉ. रोहित टिळक, मुलगी डॉ. गीताली टिळक, नातवंडे असा परिवार आहे.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे डॉ. दीपक टिळक हे पणतू होते. ‘केसरी’चे विश्वस्त संपादकपद त्यांनी भूषवलं असून ते काही काळ टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती देखील राहिले होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला त्यांच्या कार्यकाळात मोठी उंची प्राप्त झाली. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा वारसा त्यांनी पुढे नेला. वर्ष २०२१ मध्ये जपान सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रायलयाकडून जपानी भाषेच्या प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.