kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

गुरूपौर्णिमेला आदरणीय आई-वडिल आणि गुरुजनांना पाठवा हटके मराठी संदेश

गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या गुरुंना वंदन तर कराच पण त्यांनी आपल्याला या जीवनात कसं घडवलं याबद्दल त्यांचे साभार प्रदर्शन करणंही महत्त्वाचं आहे. या खास दिवशी आई-वडील, शिक्षक किंवा इतर गुरुंसाठी काही सुंदर संदेश पाठवू शकता. आषाढ महिन्यात येणारी पौर्णिमा गुरु पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी व्यासमुनींचे पूजन केले जाते म्हणून तिला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला खूप महत्त्व दिले जाते कारण गुरु हेच आपले जीवन घडवतात.

आपल्या आयुष्यात आई हे पहिले गुरु, वडील हे दुसरे गुरु आणि शिक्षक हे तिसरे गुरु असतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सर्व गुरुजनांना आदरपूर्वक शुभेच्छा देऊया. चला तर मग, पाहूया काही सुंदर कोट्स आणि मेसेज जे या दिवशी पाठवता येतील.

  • गुरु आहेत म्हणून आयुष्याला आहे अर्थ
    आई-बाबा आहात तुम्ही माझे
    पण आहात खरे गुरु या आयुष्याचे
  • आई-बाबा तुम्हीच माझे पहिले गुरु
    तुमच्यापासून माझे जग हे झाले गुरु
  • “गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर, ज्यातून अखंड ज्ञान मिळत असते.”
  • “गुरु म्हणजे एक तेजस्वी दिवा, जो स्वतः जळून दुसऱ्याला तेजोमय करतो”
  • “गुरु आणि शिष्य यांचे नाते, विश्वासाचे नातं असते.”
  • जो बनवतो प्रत्येकाला मानव,
    जो करतो खऱ्या-खोट्याची ओळख,
    अशा गुरुंना प्रणाम!
  • गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा,
    गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य
    गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती,
    गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य
    आपणा सर्वांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा!
  • गुरुपौर्णिमा मराठी कोट्स आई वडिल गुरुंसाठी
    गुरुपौर्णिमेच्या या शुभदिनी, गुरुजनांचे आशीर्वाद सदैव पाठीशी असतात.