kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

TVK प्रमुख जोसेफ विजय बनले तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री

अभिनेता ते राजकीय नेता असा प्रवास करणारे थलपती विजय तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री बनले आहेत. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना आज रविवारी (10 मे) मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. या समारंभादरम्यान, विजय भावूक झाल्याचं दिसून आले.

विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षानं पहिल्याच निवडणुकीत दमदार कामगिरी करत 108 जागांवर विजय मिळवला आहे. तसेच काँग्रेस, व्हीसीके आणि डाव्या पक्षांच्या पाठिंब्यामुळे बहुमताचा 118 चा आकडाही पार करण्यात यश आलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी या शपथविधी समारंभास उपस्थिती लावली.

विजय यांनी रविवारी (10) सकाळी 10 वाजता चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबतच इतर 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. यामध्ये TVK मधील काही ज्येष्ठ नेत्यांचाही समावेश होता. विजय हे एका आघाडी सरकारचे नेतृत्व करतील, ज्यामध्ये काँग्रेस सहयोगी पक्ष म्हणून सहभागी होईल.

तत्पूर्वी, राज्यपालांनी विजय यांना विधानसभेत 13 मे रोजी किंवा त्यापूर्वी विश्वासदर्शक ठराव संमत करून घेण्याचे निर्देशही दिले होते. गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेली अत्यंत तणावपूर्ण राजकीय अनिश्चितता शनिवारी सायंकाळी (9 मे) संपुष्टात आली. VCK आणि IUML या पक्षांनी आपला पाठिंबा जाहीर केला आणि त्यामुळे TVK ची एकूण सदस्यसंख्या 120 वर पोहोचली.

निवडणूक प्रचारादरम्यान थलपती विजय यांनी भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि पारदर्शक शासन देण्याचा संकल्प व्यक्त केला होता. आता त्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे मोठं आव्हान त्यांच्या खांद्यावर आलं आहे. समारंभस्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली असून सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोनच्या माध्यमातून प्रत्येक हालचालीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे.

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलापती विजय यांच्या पक्षाने 108 जागांवर विजय मिळवत दमदार कामगिरी केली आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला 118 चा आकडा पार करण्यासाठी त्यांना काँग्रेस, व्हीसीके आणि डाव्या पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. एकूण 120 आमदारांच्या समर्थनासह विजय आता राज्याचे प्रमुख बनले आहेत. ही कामगिरी विशेष मानली जात आहे, कारण यामुळे द्रविड पक्षांच्या दशकांपासूनच्या वर्चस्वाला आव्हान मिळालं आहे. राज्यातील दोन प्रमुख द्रविड पक्षांची DMK आणि AIADMK यांची जी आलटून पालटून चालणारी सत्ता जवळपास सहा दशकांपासून सुरू होती, तिचा आता अंत झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *