kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

ममता बॅनर्जी यांची हार हा देशाचा पराभव – संजय राऊत

ममता बॅनर्जी यांचा जो पराभव झालेला आहे. त्या म्हणतात पराभव झालेला नाही या मताशी आम्ही सहमत आहोत” असं संजय राऊत म्हणाले. तसेच, ममता बॅनर्जी यांचा पराभव करुन दाखवायचं या जिद्दीने किंवा इर्षेने ही निवडणूक लढवून ममता बॅनर्जी यांना सत्तेत येण्यापासून रोखलं. त्या जिंकलेल्या आहेत हे खरं आहे” असं देखील संजय राऊत यांनी सांगितलं.

“खरं आहे ते, कालपर्यंत त्या इंडिया आघाडी सोबत नव्हत्या. पण आता इंडिया आघाडी त्यांच्या सोबत आहे. इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांनी त्यांना फोन करुन आम्ही लढाईत आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत ही भूमिका घेतलेली आहे. राहुल गांधी, उद्धव ठाकरे सर्वच प्रमुख नेते. ममता बॅनर्जी यांचा जो पराभव झालेला आहे. त्या म्हणतात पराभव झालेला नाही या मताशी आम्ही सहमत आहोत” असं संजय राऊत म्हणाले. “ज्या पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये अमित शाह, मोदी यांनी इराण-इस्रायल युद्धाप्रमाणे परिस्थिती निर्माण केली. सैन्य, दहशत, आर्थिक दहशतवाद, अफवा, संपूर्ण केंद्र सरकार कोलकत्यात बसलं. मतदार याद्यातून नावं वगळली लाखो. ममता बॅनर्जी यांचा पराभव करुन दाखवायचं या जिद्दीने किंवा इर्षेने ही निवडणूक लढवून ममता बॅनर्जी यांना सत्तेत येण्यापासून रोखलं. त्या जिंकलेल्या आहेत हे खरं आहे” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

“आता त्या असं म्हणतात मी रस्त्यावर उतरुन ममता बॅनर्जी काय आहे ते दाखवीन. त्यांनी असं सांगितलं की मी राजीनामा देणार नाही कारण मी विजयी झालेली आहे. राजीनामा देणार नाही हा त्यांच्याच आंदोलनाचा एक भाग आहे. सरकारविरोधी, निवडणूक आयोगाविरोधी किंवा लोकशाहीविरोधी ज्या कृत्यांची मालिका तिथे झाली. हा त्यांच्या आंदोलनाचा एक भाग आहे. उद्धव ठाकरे यांची भूमिका तीच आहे. आम्ही सर्व या लढाईत तुमच्यासोबत आहोत” असं संजय राऊत म्हणाले. “आम्हाला संघर्ष अजून तीव्र करावा लागेल. आम्ही तो करणार. ममता बॅनर्जींसोबत इंडिया आघाडी आहे. ममता बॅनर्जी हरल्याचा कोणाला आनंद होत असेल तर हा आनंद व्यक्त करु नका. हा देशाचा पराभव आहे” असं संजय राऊत म्हणाले.

“जर आम्हाला लढायचं असेल हुकूमशाही विरुद्ध किंवा निवडणूक आयोगाच्या पक्षपाती धोरणाविरुद्ध. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचा गुलाम झाला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी यापुढे निवडणुका लढवायच्या किंवा नाही ही भूमिका घ्यावी लागेल. हे जर आम्हाला देशात चित्र उभं करायचं असेल तर विरोधी पक्षाला एकत्र यावं लागेल. सत्ताधारी पक्षात काही लोकं आहेत, त्यांना लोकशाहीचं हे पतन पटत नाहीय. त्यांना सुद्धा आम्हाला आवाहन करावं लागेल देश संकटात आहे” असं संजय राऊत म्हणाले.

“जसं इंदिरा गांधींची आणीबाणी काही जणांना मान्य नव्हती. त्या विरोधात जगजीवनराम, हेमवती बहुगुणा असतील असे अनेक प्रमुख लोक त्यावेळी जनता पक्षच्या प्रवाहात सामील झाले. हुकूमशाही विरोधात लढले. असे काही लोक आजही सत्ताधारी पक्षात आहेत. त्यांना असं वाटतं की ज्या पद्धतीने देश पुढे निघालेला आहे हे योग्य नाही. अशा लोकांना सुद्धा इंडिया आघाडीतर्फे आवाहन केलं जाईल” असं संजय राऊत म्हणाले.

“नितीश कुमार पहिल्यापासून भरकटलेले होते. नितीश कुमार कधीच कुठे स्थिर नव्हते. नितीश कुमार यांचं मानसिक संतुलन किती बिघडलेलं आहे हे आपण पाहत असतात. त्यामुळे नितीश कुमार जाणार हे ममता बॅनर्जी यांनी पहिल्याच बैठकीत सांगितलं होतं” असं संजय राऊत म्हणाले.

लाडकी बहिण योजना वादात सापडली आहे. 65 लाख अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे घेण्याची सरकारची तयारी आहे. या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, “जर कोणी बनावट कागदपत्रं, भ्रष्ट मार्गाने सरकारच्या तिजोरीत हात घातला असेल त्यांच्या पर्समध्ये पैसे गेले असतील तर तो गुन्हा आहे. सरकारला हे कळत असले, सरकारी तिजोरीची लूट होतेय तर त्याची चौकशी झाली पाहिजे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *