kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

खासदार सुप्रिया सुळे यांच्या घातपाताचा प्रयत्न?

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई-पुणे महामार्गावर त्यांच्या वाहनाला धडक दिली. सुप्रिया सुळे यांनी स्वत: याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली. सुप्रिया सुळे यांनी धडक दिलेल्या वाहनाची नंबर प्लेटही शेअर केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने प्रवास करीत असताना एका कारने त्यांच्या वाहनाला डाव्या बाजूने धडक दिली. गाडीतील सगळे सुखरुप आहेत अशी माहिती सुप्रिया सुळे यांची दिली. याशिवाय गतीने आणि निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. सुप्रिया सुळे यांनी सीट बेल्ट लावला होता. त्यामुळे सुदैवाने कुणाला काहीच झालं नाही.

सुप्रिया सुळे यांच्या अपघातानंतर घातपाताची भीती व्यक्त केली जात आहे. शरद पवार गटाचे नेते सुनिल माने यांनी याबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “अजित पवार यांचा घातपात करण्यात आला त्याच पद्धतीने खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला गुजरात मधल्या एका गाडीने अतिशय भयानकपणे धडक दिली. सुप्रिया सुळे देशाच्या नेत्या आहेत. अजित दादा नंतर सुप्रिया सुळे महत्त्वाच्या नेत्या आहेत. सुप्रिया सुळेंना अपघातात बरं वाईट करण्याचा हा प्रयत्न नव्हता ना अशी आमच्या मनात शंका आहे. राज्य सरकारने कसून चौकशी करावी अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *