भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी भवानीपूर आणि नंदीग्राम या दोन विधानसभा जागांवर विजय मिळवून पश्चिम बंगालच्या राजकारणात दबदबा सिद्ध केला आहे. आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर मतदारसंघात पराभव झाला आहे. भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा 15,105 मतांच्या फरकानं पराभव केला. सकाळी मतमोजणी सुरू झाल्यापासूनच या दोन्ही उमेदवारांमध्ये आघाडी मिळवण्यासाठी चुरशीची लढत सुरू होती. अखेरच्या फेरीत सुवेंदू अधिकारी यांनी विजय मिळवला. भवानीपूर मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव झाल्यानं तृणमुल पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
भवानीपूरमधील मतमोजणीच्या 20 व्या आणि अंतिम फेरीनंतर भारतीय निवडणूक आयोगाननं निकाल जाहीर केला. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा 15,105 मतांच्या मोठ्या फरकानं पराभव केला आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील दिलेल्या माहितीनुसार, 19 व्या आणि अंतिम फेरीच्या समाप्तीपर्यंत सुवेंदू अधिकारी यांना 1,27,301 मते मिळाली होती.
भवानीपूर मतदारसंघातील कल 16 व्या फेरीत एका महत्त्वपूर्ण बदल जाणवत होते. या फेरीत भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांनी 53,932 मते मिळवली होती. ते मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापेक्षा किंचित पुढे गेले. मतमोजणीच्या 16 फेऱ्यांनंतर निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दोन्ही उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत झाल्याचं दिसून आलं. बॅनर्जी 53,369 मतांसह पिछाडीवर होत्या. तर CPI(M) चे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते. यापूर्वी, 14 व्या फेरीच्या अखेरीस बॅनर्जी यांनी 3,830 मतांची मोठी पिछाडी कमी केली होती. परंतु 17 व्या फेरीनं पुन्हा एकदा भाजपाचे उमेदावर सुवेंदू आघाडीवर आले. मुख्यमंत्री मतमोजणी केंद्रातून बाहेर पडत असताना भवानीपूर येथील तणावाची स्थिती होती. मतमोजणी केंद्राबाहेर भाजपा समर्थकांचा मोठा जमाव जमला होता. “घोटाळेबाज ममता, दूर जा” अशी घोषणाबाजी सुरू होती. लोकांमध्ये सत्ताविरोधी लाट दिसून आली.










Leave a Reply