घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने विजयाची तयारी सुरू केली आहे. पक्षाचे तरूण नेतृत्व, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी पक्षाकडे अर्ज दाखल करत उमेदवारीची मागणी केली आहे.

ॲड. अमोल मातेले यांच्या माध्यमातून घाटकोपर पश्चिम मतदारसंघात भव्य युवा संवाद कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमास स्वतः शरद पवारांनी उपस्थित राहून तरुणांसोबत संवाद साधला. युवा संवाद कार्यक्रमास युवक व युवतींना हाजारोच्या संख्येने लाभलेला प्रचंड प्रतिसाद पाहता घाटकोपर (पश्चिम) विधानसभा मतदारसंघात शरद पवारांचा करिश्मा असल्याचे स्पष्ट होते.

पक्षाकडे ॲड. अमोल मातेले हा कार्यक्षम व युवा चेहरा उपलब्ध असल्याने या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पारडे जड मानले जात आहे.