लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी हे आजपासून दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. त्यांच्या हस्ते आज (शुक्रवार ४ ऑक्टोबर) कोल्हापुरातील कसबा बावडा येथील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे नावरण करण्यात येणार आहे. याशिवाय ते शनिवारी होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे.

तसेच गुरुवारी रात्री केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. यावरून आता विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. याशिवाय मध्यरात्री मंत्री संजय राठोड यांच्या गाडी गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात गाडीचा चालक गंभीर असल्याची माहिती आहे. यासह इतर घडामोडींकडेही आपलं लक्ष असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *