Breaking News

… बांगर वहिनीला पळवून लावले.. ‘ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ व्हायरल

राज्यात सध्या चर्चा चालू आहेत त्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या ! महाराष्ट्रात विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. प्रत्येक पक्षाने कंबर कसली असून यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे लागून राहिले आहे. अशातच, ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांनी संतोष बांगर यांच्या पत्नी विरोधात एक व्हिडीओ सोशल मीडिया वर पोस्ट केला आहे..

माझ्या लाडक्या बांगर वहिनी(संतोष बांगर यांच्या पत्नी) आपल्या नवऱ्याला मतदान करा म्हणुन जनतेला सांगत होत्या, सुज्ञ जनतेने तोंडावरच “नाही करणार” असे बोलून आमच्या बांगर वहिनीला पळवून लावले.. अशा कॅप्शन सहित त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. सध्या या व्हिडिओची सर्वत्र चर्चा होत असून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

https://www.facebook.com/ayodhya.poul.5/videos/1455065758503745