सुमारे वीस वर्षांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन प्रमुख व्यक्तिमत्त्वं, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, एकाच मंचावर एकत्र आले आहेत. वरळी येथील विजय मेळाव्यामध्ये हे दोन्ही ठाकरे बंधू सहभागी झाले आहेत. उद्धव आणि राज ठाकरे यांना एकत्र आणण्यामागे मराठी भाषेवरील प्रेम हेच प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे. महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा धोरणाबाबत एक आदेश जारी केला होता, ज्यावरून मोठा वाद निर्माण झाला. या आदेशाला दोन्ही ठाकरे बंधूंनी तीव्र विरोध दर्शवला. विरोधामुळे सरकारने आपल्या आदेशावर ‘यू-टर्न’ घेतला आणि हिंदी सक्तीबाबतचा आदेश रद्द केला. सरकारच्या या निर्णयाला आपला आणि मराठी भाषेचा विजय मानत आज हा ‘विजयी मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.
भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही असं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत. असं उद्धव ठाकरे म्हणले आहेत.
आणखी काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
- बऱ्याच वर्षांनी दोघांची भेट व्यासपीठावर झाली आहे
- आज आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं
- एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी
- भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही असं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत
- आमच्या दोघांमध्ये जो अंतरपाट होता तो अनाजी पंतांनी दूर केला
- मुख्यमंत्री असताना मराठीची सक्ती केली आणि करणारच
- दिल्लीत बसलेल्या मालकांचे बूट चाटण्यासाठी आमचं सरकार पाडलं
- म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे
- पालख्यांचे भोई होणार की माय मराठीला पालखीमध्ये बसवणार?
- हिंदीची सक्ती कधीच होऊ देणार नाही
- मराठी आणि महाराष्ट्र धर्मासाठी उभं राहणारच
05 Jul, 25 : 01:12 PM
#WATCH | Mumbai: Shiv Sena (UBT) Chief Uddhav Thackeray, Maharashtra Navnirman Sena (MNS) chief Raj Thackeray, NCP-SCP MP Supriya Sule, NCP-SCP leader Jitendra Awhad and others present at the joint rally at Worli Dome in Mumbai, after the Maharashtra government scrapped two GRs… pic.twitter.com/t7JtefjiD6
— ANI (@ANI) July 5, 2025














