आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. भगूर नगरपरिषदेत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेची तब्बल 25 वर्षांची सत्ता संपुष्टात आणली आहे. मतमोजणीला सुरुवात होताच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने दमदार कामगिरी करत विजयाचे खाते उघडले आणि एकूण सात उमेदवारांनी विजय मिळवला आहे. सध्याच्या निकालानुसार भगूर नगरपरिषदेत एकूण १७ जागांवर अजित पवार गट आणि भाजप, तर ३ जागांवर शिवसेना (शिंदे गट) विजयी झाल्याची माहिती मिळत आहे. या निकालामुळे भगूरच्या राजकारणात मोठा बदल झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मतमोजणीला सुरुवात होताच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली. पहिल्या काही फेऱ्यांमध्येच राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आघाडी घेत विजय निश्चित केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेरणा बलकवडे यांनी विजय मिळवला असून, त्यांना भाजपचा पाठिंबा आहे.
नाशिक जिल्हा नगर परिषदेत कोण आघाडीवर?
भगूर – अजित पवारांची राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे विजयी
पिंपळगाव बसवंत – भाजपचे डॉ. मनोज बर्डे आघाडीवर
सिन्नर – अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विट्ठलराजे उगले आघाडीवर
ओझर – भाजपच्या अनिता घेगडमल आघाडीवर
त्र्यंबकेश्वर – भाजपचे कैलास घुले आघाडीवर
इगतपुरी – शिंदेंच्या शिवसेनेच्या शालिनी खताळे आघाडीवर














