राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे आज (28 जानेवारी) सकाळी बारामती विमानतळावर भीषण अपघातात निधन झाले. विमानाचा अपघात झाल्यानंतर जमिनीवर कोसळल्यानंतर अक्षरश: कोळसा झाला. त्यामुळे या भयावह अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवार हे मुंबईहून विमानाने बारामती विमानतळावर उतरत असताना अपघात झाला. लँडिंगच्या प्रयत्नात विमान runway च्या बाजूला जाऊन अपघातग्रस्त झाले. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये त्यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (PSO) आणि एक अटेंडंट, तसेच दोन पायलट्स (PIC + FO) यांचा समावेश आहे. अजित पवारांचे पार्थिव बारामती वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आलं आहे.
शरद पवार साहेबांना कसं सांगायचं?
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवारांना सांगायचं तरी काय? असा प्रश्न पवार कुटुंबीयांसमोर होता. त्यामुळे अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची बातमी शरद पवार यांना देण्यात आली नव्हती. मेडिकल चेक अपसाठी पवार यांना रुग्णालयात नेहण्यात आले होते. पवार यांना घेऊन कुटुंबीय पुन्हा घरी आले. घरात कुटुंबियांकडून दादांच्या अपघाती निधनाची माहिती पवारांना देण्यात आली. अपघाती निधनाचे वृत्त समजताच शरद पवार बारामतीसाठी रवाना झाले आहेत.















