कळमनुरी नगरपरिषदेची पहिली सर्वसाधारण सभा मंगळवार, दि. १३ जानेवारी रोजी नगरपरिषद सभागृहात पार पडली. या सभेमध्ये उपनगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या शहर विकास आघाडीमुळे उपनगराध्यक्ष पदासाठी शिंदे सेनेचे शिवराज चौधरी पाटील यांचे दोन नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. दोन्ही अर्ज वैध ठरविण्यात आले असून अन्य कोणताही अर्ज नसल्याने शिवराज चौधरी पाटील यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. याच बैठकीत स्वीकृत (नामनिर्देशित) सदस्य पदासाठी शिंदे सेनेच्या संख्याबळामुळे दोन अर्ज प्राप्त झाले. त्यानुसार योगेश पत्की व अय्याज पठाण यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली. या बैठकीच्या पीठासीन अधिकारी व अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष आश्लेषा वैभव चौधरी होत्या तर शासकीय प्रतिनिधी म्हणून मुख्याधिकारी रविराज दरक, नगर अभियंता निकेत यरमळ, विशाल जारे, अमोल मोरे, मोहम्मद नदीम, मोहम्मद मगदूम, मनोज नकवाल, सुभाष काळे हे उपस्थित होते.
यावेळी नगरसेवकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आयुब पठाण, खाजा बागवान, शिवसेनेचे कैलास पारवे, गंगाधर बेले, किशोर नानाराव भालेराव, शेख रिजवाना बी शेख असेफ, राणी विलास शिंदे, अर्चना सतीश खर्जुले, रवी आप्पाराव शिंदे, प्रणिता कुलभूषण बुर्से, निर्मला शामराव पाटील, नाईक शफीता बेगम खाजा, शैलेश शंकरराव उबाळे, प्रकाश यादवराव घुसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे फरहाना आवेस पठाण, फहीमुनिस्सा बेगम अब्दुल्ला पठाण, भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका नर्मदा प्रकाश नाईक, वर्षा राजेश जाधव तसेच काँग्रेसचे नगरसेवक शेख महेबुब शेख मुसा आदी उपस्थित होते.
सर्वसाधारण सभेनंतर नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. नगरपरिषदेच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष शिवराज पाटील व स्विकृत सदस्य बबलू पत्की व अय्याज पठाण यांची निवड झाल्या नंतर श्रीराम बांगर यांचे उपस्थितीत सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना श्रीराम बांगर म्हणाले की, आमदार संतोष बांगर यांचे नेतृत्वात कळमनुरी नगरपालिकेत शिवसेनेला मोठा यश प्राप्त झाले यामुळे कळमनुरी शहराच्या काया पालट करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी गवाही श्रीराम यांनी दिली.















