kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मुंबई, हिंदू सण ‘रक्षाबंधन’ दिवशी परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भावना पायदळी तुडवण्यासारखे!-– अ‍ॅड. अमोल मातेले

भारतीय परंपरेतील बंधुत्वाचे प्रतीक आणि पवित्र हिंदू सण – रक्षाबंधन यावर्षी ९ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा केला जात आहे. त्याच दिवशी “ज्युनिअर अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट” ही महत्त्वाची परीक्षा आयोजित करण्यात आली आहे, ही बाब अत्यंत खेदजनक आणि दुर्दैवी आहे.रक्षाबंधन हा सण बहिणी आणि भावामधील अतूट प्रेम, विश्वास व सुरक्षा यांचे प्रतीक आहे. वर्षभर बहिण भावाची वाट पाहते. अशा दिवशी बहुसंख्य विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर जाण्याची सक्ती करणे म्हणजे त्यांच्यावर भावनिक अन्याय करणे होय.सरकारने एकीकडे सुट्टी जाहीर करून रक्षाबंधनाच्या महत्त्वाला मान्यता दिली आहे आणि दुसरीकडे अशाच दिवशी परीक्षा घेणे ही थेट विरोधाभासी आणि असंवेदनशील भूमिका आहे. असे राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे, मुंबई अध्यक्ष, अ‍ॅड. अमोल मातेले यांनी म्हंटले आहे.

परीक्षा पुढे ढकलण्यामागे युक्तिवाद विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक आणि मानसिक आरोग्याचा विचार: परीक्षेच्या दडपणात रक्षाबंधन साजरा न करता अनेक उमेदवार मानसिक तणावात जातील.कौटुंबिक सलोख्याला तडा: बहिणींसोबतचा रक्षाबंधनाचा क्षण गमावणे आयुष्यभर सल देणारे ठरू शकते.भावनांचा अपमान हे केवळ एक शैक्षणिक मुद्दा नसून, धार्मिक आणि सामाजिक भावना जपण्याचाही विषय आहे. गैरव्यवस्थापनाचा संशय: जाणूनबुजून धार्मिक सणांवर परीक्षा ठेवून विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये असंतोष निर्माण करण्याचा हा प्रकार नियोजनाचा भाग तर नाही ना? याची चौकशी व्हावी. असे त्यांनी म्हंटले आहे.

आणखी काय म्हणाले अ‍ॅड. अमोल मातेले ?

हिंदुत्वाच्या नावाने मोठमोठ्या घोषणा करणारे सरकार स्वतःच्या कृतीत मात्र हिंदू सणांना दुय्यम स्थान देत आहे, ही मोठी शोकांतिका आहे. आम्ही विचारतो सणाच्या दिवशी परीक्षा घेण्याची इतकी काय घाई होती? हे सरकारला विचारल्याशिवाय राहवत नाही की, विद्यार्थ्यांपेक्षा मोठं अजेंडा तुम्हाला वाटतंय का?

राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरद पवार पक्षाच्या वतीने आम्ही भारत सरकार व संबंधित परीक्षा प्राधिकरणाला कळकळीची विनंती करतो की “रक्षाबंधनाच्या दिवशी आयोजित केलेली ‘ज्युनिअर अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट परीक्षा’ त्वरित पुढे ढकलावी,”आणि हिंदू भावनांचा आदर राखून भविष्यात कोणत्याही धार्मिक सणाच्या दिवशी परीक्षा आयोजित करू नये.