kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

“माझ्या प्रिय मित्रा, मुंबईत आणि नंतर दिल्लीत भेटूया”: मॅक्रॉन, मोदी यांच्या दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक, ‘हे’ मार्ग बंद

फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन मंगळवारी सकाळी मुंबईत दाखल झाले. भारताच्या तीन दिवसीय अधिकृत दौऱ्याची सुरुवात त्यांनी मुंबईतून केली. हा दौरा भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेण्यासाठी आणि ती अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वाचा आहे. मॅक्रॉन यांचा भारताचा हा चौथा दौरा असून मुंबईत त्यांचं पहिलंच आगमन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच स्वागत केलंय. मोदींनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटंलय, ‘भारतात आपले स्वागत आहे!. भारत तुमच्या भेटीची आणि आमचे द्विपक्षीय संबंध नवीन उंचीवर नेण्यासाठी उत्सुक आहे. मला विश्वास आहे की आमच्या चर्चा विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक मजबूत करतील आणि जागतिक प्रगतीला हातभार लावतील. माझ्या प्रिय मित्रा, मुंबईत आणि नंतर दिल्लीत भेटूया”.

मुंबई विमानतळावर महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि फर्स्ट लेडी ब्रिजिट मॅक्रॉन यांचं स्वागत केलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनित्रा पवार उपस्थित होत्या. आगमनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करून स्वागत त्यांचं केलं. “Bienvenue à Mumbai! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष माननीय इमॅन्युएल मॅक्रॉन आणि फर्स्ट लेडी ब्रिजिट मॅक्रॉन यांचं मुंबईत हार्दिक स्वागत! महाराष्ट्र आपलं स्वागत करतो! राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि फ्रेंच शिष्टमंडळाला आनंददायी शुभेच्छा,” असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.

मुंबईत राहण्यादरम्यान राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन दक्षिण मुंबईतील लोक भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेऊन नवीन क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाईल. तंत्रज्ञान, नावीन्य, संरक्षण आणि डिजिटल सहकार्य ही प्रमुख क्षेत्रे असतील. तसंच प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर दोन्ही नेते चर्चा करतील.