kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

बापरे !! मुनगंटीवार भर सभागृहात मुख्यमंत्र्यांना ‘हे’ काय म्हणाले???

विधीमंडळाचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार हे अधिवेशनात मनमोकळेपणाने बोलताना बघायला मिळत आहेत. विशेष म्हणजे याच अधिवेशनात नाही तर याआधीच्या उन्हाळी अधिवेशनातही सुधीर मुनगंटीवार भर सभागृहात रोखठोक बोलताना बघायला मिळाले. त्यांनी अनेक मुद्द्यांवरुन आपल्याच सरकारला घरचा आहेर दिल्याचं बघायला मिळत आहे. या सगळ्या घडामोडींनंतर आज अनोखा प्रकार बघायला मिळाला. सुधीर मुनगंटीवार भर सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून असं काही बोलून गेले की सभागृहात चांगलाच हास्यकल्लोळ बघायला मिळाला. विशेष म्हणजे यावेळी मुनगंटीवार आणि फडणवीस यांच्यात चांगलीच शाब्दिक फटकेबाजी बघायला मिळाली.

“मुख्यमंत्र्यांनी जीआर काढून भत्ता बंद केला. तुम्ही मला संधी देऊ नका. मी तुम्हाला भत्ता सुरु करण्याची संधी देतो”, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांनीदेखील तसंच प्रत्युत्तर दिलं. “आमच्या मानस पटलावर मुनगंटीवार यांची जागा फार वरची आहे. त्यांना योग्य वेळी योग्य जागा मिळेल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सुधीर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले?

“मुख्यमंत्री महोदय, चंद्रपूर, गडचिरोलीच्या जनतेने आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा आतापर्यंत नक्षलवाद कमी करण्यासाठी कष्ट केले. आपण एक जीआर काढून टाकला. तो भत्ताच बंद करुन टाकला. मोठं मन करा. नेताही मोठा असला पाहिजे आणि मनही तेवढं विशाल असलं पाहिजे. मला विश्वास आहे की, मी या निमित्ताने तुम्हाला ही संधी देतोय. तुम्ही मला कुठेही संधी देऊ नका. पण मी तो भत्ता सुरु करण्याची संधी तुम्हाला देतोय. तुम्ही मात्र तो भत्ता सुरु करावा. एवढी विनंती”, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेच्या सभागृहात केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर:

“हे जरी सभागृहाच्या पटलावरुन काढलं जाणार नाही, असं अध्यक्षांनी सांगितलं असलं तरी आमच्या मानस पटलावर सुधीरभाऊंची जागा अतिशय वरची आहे. त्यामुळे योग्यवेळी योग्य अशी जागा त्यांना मिळेल”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की , …

त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, “मुख्यमंत्री महोदय फार वरची जागा द्यायचा विचार करु नका”. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. “अध्यक्षांच्या जागेला कुठलाही धोका नाही”, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.