भाजपासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच कमळ फुलले आहे. आपले लोकप्रिय आणि यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने ममता दीदींना पराभवाची ‘झालमुडी’ दिली आहे. गुंडगिरी आणि भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या जनतेने पश्चिम बंगालमध्ये खऱ्या लोकशाहीची स्थापना केली आहे. त्यांनी विकास, प्रगती, स्थैर्य आणि शांततेसाठी मतदान केले. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आहे. या शताब्दी वर्षात पूजनीय श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जन्मभूमीत भाजपाचा विजय हा सर्वार्थाने ऐतिहासिक आहे, असे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
आज भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी भवानीपूर आणि नंदीग्राम या दोन विधानसभा जागांवर विजय मिळवून पश्चिम बंगालच्या राजकारणात दबदबा सिद्ध केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर मतदारसंघात भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा 15,105 मतांच्या फरकानं पराभव केला. सकाळी मतमोजणी सुरू झाल्यापासूनच या दोन्ही उमेदवारांमध्ये आघाडी मिळवण्यासाठी चुरशीची लढत सुरू होती. अखेरच्या फेरीत सुवेंदू अधिकारी यांनी विजय मिळवला. भवानीपूर मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव झाल्यानं तृणमुल पक्षाला मोठा धक्का बसला आहे.











Leave a Reply