kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

देवेंद्र फडणवीस हे चोरी करुन मुख्यमंत्री झाले; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस हे चोरी करून मुख्यमंत्री झाल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. दोन दिवसापूर्वी नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्याने तहसीलदारांची गाडी फोडली. एकंदरीत जनतेच्या मनात सरकार विरोधात असंतोष असल्याचे मत हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले. कर्जमाफीचं आश्वासन देऊन देखील कर्जमाफी करत नाहीत. शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांना काँग्रेसचा पाठिंबा आहे. बच्चू कुडू यांच्याशी आमचे संभाषण झालं आहे. त्यांच्या मागण्याला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असल्याचे सपकाळ म्हणाले.

1 नोव्हेंबरला मत चोरीच्या अनुषंगाने सर्वपक्षीय मोर्चा असल्याचे सपकाळ म्हणाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत आघाडी करण्याचा कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव काँग्रेसकडे प्राप्त झालेला नाही. त्यामुळं या प्रश्नाचे उत्तर देण्याची आवश्यकता नाही असे सपकाळ यावेळी म्हणाले.

सरकारच्या विरोधात जनतेत मोठा असंतोष निर्माण झाला आहे. सरकारनं कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे. मात्र, अद्यापही सरकारने कर्जमाफी केली नसल्याचे मत हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले. आम्ही शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये देण्याची मागणी केली होती. मात्र, त्याबाबत कोणताही निर्णय घेतला आहे. सध्या जनतेचा उद्रेक होताना दिसत आहे. फडणवीस हे चोमू मुख्यमंत्री आहेत. ते मत चोरुन मुख्यमंत्री झाल्याची टीका यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पिकाबरोबर जमिनी देखील वाहून गेल्या आहेत. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तुटपुंजी मदत केल्याचा आरोप करण्यात येत आहे. चअनेक शेतकऱ्यांना अद्याप मदत देखील मिळाली नाही. तसेच कर्जमाफीचे आ्सानसन सरकारने दिले होते. अद्याप देखील सरकारनं याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळं राज्यातील शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत.