kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

नागपूर जिल्ह्यात भाजपनं एकहाती गड राखला

राज्यभरातील नगरपरिषद, नगरपंचायतींचा निकाल समोर आला आहे. अशातच राज्याचं लक्ष लागलेल्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम पिचवर भाजपनं नगरपरिषद, नगरपंचायतींसाठीची निवडणुकीत दमदार कामगिरी केली आहे. यात 27 पैकी 21 जागी भाजपने विजय मिळवला आहे. मात्र विदर्भात भाजपला मात्र निम्मं यश मिळालं आहे. तर काँग्रेसनेही एकूणच विदर्भात लक्षणीय यश मिळवल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकंदरीत विदर्भात नेमकं कुणाला यश मिळालंय हे जाणून घेऊ.

नागपुरात नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र विदर्भातील तब्ब्ल 100 नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये भाजपाला निम्मं यश मिळाल्याचे चित्र आहे. ज्यामध्ये 100 नगरपरिषद, नगरपंचायतींत भाजपने 50 जागांवर विजय अथवा आघाडी मिळवली आहे. तर दुसरीकडे राज्यातील एकूण नगरांध्यक्षाची आकडेवारी लक्षात घेतली तर त्यापैकी 120 जागी भाजपला यश आले आहे. त्यापैकी एकट्या विदर्भातून 50 नगरांध्यक्ष हे निवडून आले आहे. त्यामुळे भाजपसाठी एकप्रकारे विदर्भ या निकालात महत्वाची भूमिका बजावत आहे.

तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेनेही विदर्भात 8, तर अजित दादांच्या राष्ट्रवादीने 4 जागांवर यश मिळवलं आहे. मात्र तुलनेने पश्चिम विदर्भात भाजपची काहीशी पिछाडी झाल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे विदर्भात 25 नगराध्यक्षांच्या जागांवर काँग्रेसने लक्षणीय यश मिळवले आहे.