महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये अजित पवार यांच्या चार सभा होत्या. या सभांसाठी ते सकाळीच नेहमीप्रमाणे लवकर बाहेर पडले होते. मुंबईहून बारामतीसाठी आज सकाळी विमान निघालं होतं. यादरम्यान लँडिंगदरम्यान बारामतीमध्ये विमानाचा अपघात झाला. यावेळी अजित पवारांसह अन्य पाचजण देखील विमानात होते. परंतु विमानाचा अपघात इतका भीषण होता की, अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला.
अजितदादांचे काळीज चिरणारे शब्द, नेमकं काय म्हणाले होते?
उपमुख्यमंत्री अजित पवार विमान प्रवासाबाबत अत्यंत काळजी घेत होते. याचा प्रत्यय त्यांच्याच तोंडून एकदा ऐकायला मिळाला होता. 9 जानेवारी 2026 रोजी मिरजमध्ये महानगरपालिका प्रचारासाठी अजितदादा आले असताना विमान उड्डाणासाठी उशीर होत असला आणि वैमानिकाचा निरोप आला की मला सभा आवरून जावं लागतं, असं अजितदादा पदाधिकाऱ्याना सांगत होते.
विमानात कोण कोण होते?
अजित पवार
विदीप जाधव
पिंकी माळी
कॅप्टन सुमित कपूर
कॅप्टन शांभवी पाठक















