kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्येही मते चोरण्याचा प्रयत्न – राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी ओडिशामध्ये भाजपवर मोठे आरोप केले. “महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्येही मते चोरण्याचा प्रयत्न चालू आहे. निवडणूक आयोगाने नवीन कट रचला असून ते भाजपसाठी काम करत आहेत” अशी गंभीर टीका त्यांनी ‘संविधान बचाव’ सभेत केली. यावेळी, मल्लिकार्जुन खरगे (काँग्रेस अध्यक्ष), के. सी. वेणुगोपाल (सरचिटणीस), भक्त चरण दास (ओडिशा काँग्रेस अध्यक्ष) आदी नेते सभेला उपस्थित होते.

* महाराष्ट्रात 1 कोटी नवीन मतदार कोठून आले? आम्ही व्हिडिओग्राफी मागितली पण निवडणूक आयोगाने दिली नाही.
*बिहारमध्येही हाच प्रयत्न चालू आहे. आम्ही भाजपला निवडणुका चोरू देणार नाही.” “ओडिशा सरकार अदानी चालवतात, तर अदानी मोदींना चालवतात.
*भाजप 5-6 मोठ्या कंपन्यांना ओडिशाची संपत्ती देत आहे
*पाणी, जंगल आणि जमीन आदिवासींची आहे आणि तशीच राहील
*आदिवासींना विचारल्याशिवाय जमिनीतून हटवले जाते