राज्यात निवडणुका जाहीर झाल्यापासून सर्वच पक्षांकडून मोठी तयारी सुरू आहे. इच्छुकांना तसंच वरिष्ठांना तिकीट न मिळाल्याने अनेक ठिकाणी नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. अगदी निवडणुकीच्या तोंडावर अनेकांनी पक्षांतर करत नाराजीही व्यक्त केली आहे. दुसरीकडे राज्यात थंडीचा कडाका कायम आहे. अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा 10 अंशाखाली गेला आहे. राज्यात थंडीची लाट नसली तरी गारवा कायम राहणार आहे. पुढील चार दिवस हीच स्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
दरम्यान, पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे ला अजित पवार गटाकडून प्रभाग १० बावधन मधून एबी फॉर्म देण्यात आला आहे. जयश्री मारणे या अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवार आहेत. गुन्हेगारी मिटवा म्हणणाऱ्या अजित पवारांनी गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी दिली.













