झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या मालिकेतील अधिपती आणि अक्षराच्या जोडीने महाराष्ट्रातील जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. आता ही मालिका थोड्या वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. मालिकेत अधिपती आणि चारुलताच्या नात्यामध्ये जवळीक येण्यासाठी चारुलताचे प्रयत्न सुरूच आहेत. हे सगळं सुरु असताना अधिपती कसा प्रतिक्रिया देतो हे पाहण्यासारखे आहे.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत चारुहास चारुलताला घेऊन पहिल्यांदा त्यांच्या शाळेत जातो. तिथे भुवनेश्वरी विद्यामंदीर हा बोर्ड पाहून चारुहास तो बोर्ड बदलून त्याला चारुलता विद्यामंदीर करण्याचा निर्णय घेतो. पण अक्षरा यावर त्यांना पुन्हा नीट विचार करायला सांगते कारण या कृतीने अधिपती चिडणार यावर तिला खात्री आहे.

दुसरीकडे चारुलता अधिपतीला फॅक्टरीमध्ये डबा पाठवते. मिसळ पाहून अधिपतीचा चेहरा खुलतो मात्र जेव्हा त्याला हे कळतं की हा डबा चारुलताने पाठवला आहे तेव्हा तो प्रचंड चिडतो. चारुलताला तो स्पष्ट सांगतो की त्याची आई होण्याचा प्रयत्न करु नकोस. घरात यामुळे पुन्हा दुषीत वातावरण होतंय. भुवनेश्वरीला शोधण्याचे अधिपतीचे प्रयत्न पुन्हा जोर धरु लागतात. अधिपती आणि चारुलता मध्ये आई-मुलाचं नातं निर्माण होईल का? चारुहास, शाळेचा बोर्ड चारुलताच्या नावावर बदलेल का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. त्यांना या प्रश्नांची उत्तरे मालिकेच्या आगामी भागात मिळतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *