मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावाशेवा अटल सेतूच्या वापराकरिता पथकरात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय कायम ठेवण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच ईलेक्ट्रीकल मोटार कार, बसेस यांनाही अटल सेतूच्या पथकरातून पूर्ण सूट देण्याबाबतचा मुद्दाही अधिसूचनेत समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे ई- व्हेईकल्स धारक तसेच अन्य वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाने 4 जानेवारी 2024 रोजीच्या बैठकीत अटल सेतूच्या वापराकरिता पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाप्रमाणेच पुढे 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 पर्यंत पथकर आकारण्यास मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर इतर वाहनांकरिता एकेरी प्रवासाचा पथकर दर ही निश्चित करण्यात आले.
असे असतील टोल दर
वाहनांचा प्रकार – मोटर, जीप, व्हँन, हलके मोटार वाहन
शिवडी ते गव्हाण – 250 रुपये
शिवडी ते शिवाजीनगर – 200 रुपये
शिवाजी नगर ते गव्हाण – 50 रुपये
वाहनांचा प्रकार – हलके व्यावसायिक वाहन, हलके मालवाहू वाहन, मिनी बस
शिवडी ते गव्हाण – 400 रुपये
शिवडी ते शिवाजीनगर – 320 रुपये
शिवाजी नगर ते गव्हाण – 80 रुपये
वाहनांचा प्रकार – ट्रक अथवा बस ( दोन आसांचे)
शिवडी ते गव्हाण – 830 रुपये
शिवडी ते शिवाजीनगर – 655 रुपये
शिवाजी नगर ते गव्हाण – 170 रुपये
वाहनांचा प्रकार – तीन आसांचे व्यावसायिक वाहन
शिवडी ते गव्हाण – 905 रुपये
शिवडी ते शिवाजीनगर – 715 रुपये
शिवाजी नगर ते गव्हाण – 185 रुपये
वाहनांचा प्रकार – अवजड बांधकाम यंत्रसामग्री, जमीन खोदाई यंत्रसामग्री, अधिक आसांचे वाहन
शिवडी ते गव्हाण – 1300 रुपये
शिवडी ते शिवाजीनगर – 1030 रुपये
शिवाजी नगर ते गव्हाण – 270 रुपये
वाहनांचा प्रकार – अति अवजड वाहन, सात अथवा त्यापेक्षा अधिक आसांचे वाहन
शिवडी ते गव्हाण – 1500 रुपये
शिवडी ते शिवाजीनगर – 1255 रुपये
शिवाजी नगर ते गव्हाण – 325 रुपये












