kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते, ॲड. अमोल मातेले यांनी आमदार अमित साटम यांच्यावर सोडले टीकास्त्र !; म्हणाले …

भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवर केलेली टीका म्हणजे “भलत्याच घरचा राग आपल्याच लोकांवर काढणे” याचे उत्तम उदाहरण आहे. स्वतःच्या अपयशाची भांडी झाकण्यासाठी दुसऱ्यांवर चिखलफेक करणे हेच त्यांच्या राजकारणाचे ‘नवनीत’ झाले आहे. असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आणि युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले म्हणाले आहेत.

साटम साहेबांनी आरोपांची तोफ झाडली, पण तथ्य मात्र चुकूनही उघड केले नाही. “घरचे दिवे काळोखे”२० वर्षे उपमहापौर भाजपचा! साटम साहेब ठाकरे यांच्या २० वर्षांवर चर्चा करतात, पण महापालिकेतील २० वर्षांचा उपमहापौर हा भाजपचाच होता हे ते सोयीस्करपणे विसरतात. म्हण आहे.“आपलं पाप झाकायला दुसऱ्यावर आरोप करणं सोपं असतं.” असंही ते म्हणाले.

चार वर्षांचा प्रशासक राज नियंत्रण तुमच्याकडे, काम शून्य
आज महापालिका पूर्णपणे राज्य सरकारच्या नेतृत्वाखाली आहे. चार वर्षे पालिकेवर भाजपचा अघोषित ताबा. पण रस्ते तसेच खड्डेमय,रुग्णालयांची अवस्था दयनीय,पाणीटंचाई कायम,शाळा व क्रीडांगणांचे प्रश्न न सुटले
मग, उद्धव–राज यांच्या भेटींवर बोट दाखवून काय साधणार?
“काम नसेल तर नुसती ओरड कोण करू शकतो, हे दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद.”

कपूर हॉस्पिटलचे नाव घेताच शांतता कारण तिथे ‘काम’ नाही, फक्त ‘वचने’ आहेत.स्वतःच्या मतदारसंघातील कपूर हॉस्पिटलची दैन्यावस्था पाहूनही एक शब्द काढायची हिंमत साटम साहेब दाखवत नाहीत.
म्हण आहे.“ज्याच्या घरी धुराळा, त्याने दुसऱ्याला राखेविषयी उपदेश करू नये.”

मुंबईकरांना भेटी–गाठी नव्हे, सुविधा हव्यात पण ती देण्याची जवाबदारी कोणाची?साटम साहेब म्हणतात की मुंबईकरांना भेटीगाठींचं काही देणंघेणं नाही. अगदी बरोबर!पण मग प्रश्न असा
मुंबईकरांना सुविधा कोणी द्यायच्या? ज्या महापालिकेवर तुमचे नियंत्रण आहे, तिनेच ना?

रस्ते, शाळा, रुग्णालये व पाणीपुरवठा इथे तुमचा रिपोर्ट कार्ड ‘गुलाबी’ नाही… तो पूर्ण पांढरा, कोरा आहे.

“ज्याचं पोट दुखतं, त्यालाच त्या भेटीचा त्रास होतो”दोन्ही ठाकरे एकत्र बसले, बोलले तर भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण होते. “जेथे दोन माणसं एकत्र येतात, तेथे तिसऱ्याचा चेहरा उतरतो.”साटम साहेबांचा चेहरा तसाच दिसत आहे.

साटम साहेब २० वर्षांच्या ठाकरे काळावर प्रश्नचिन्ह लावतात, पण त्या काळात स्वतःची उपस्थिती आणि भाजपचा उपमहापौर विसरतात.हे विस्मरण नव्हे तर सोयीस्कर अंधत्व आहे.

“साटम साहेब, इतरांच्या मांडीवर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाच्या २०वर्षांच्या उपमहापौरपदाची आणि 4 वर्षांच्या प्रशासक राजची हिशोबाची वही आधी उघडा. ‘खोबऱ्याच्या झाडावर चढून काजू शोधत’ बसू नका.”