kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात इनकमिंग सुरु !!

देशात आणि राज्यात राजकीयदृष्ट्या महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. अशातच, मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईत मातोश्री निवास्थानी शेकडो जणांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. अहिल्यानगरमधील अकोले येथील कुशाबा धांडे, सिंधुदुर्गातील राकाशेठ चव्हाण, रत्नागिरी खेडमधील शिंदेगटाचे संघटक रविंद्र झगडे, पनवेलमधील राजेश मोहिते यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे.

अहिल्यानगरमधील अकोले येथील कुशाबा धांडे, सिंधुदुर्गातील राकाशेठ चव्हाण, रत्नागिरी खेडमधील शिंदेगटाचे संघटक रविंद्र झगडे, पनवेलमधील राजेश मोहिते यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते सचिव विनायक राऊत शिर्डी लोक मतदारसंघाचे संघटक रावसाहेब खेवरे (नाना) अकोले तालुकाप्रमुख मच्छिंद्र शेठ धुमाळ, अहिल्यानगर उत्तर उपजिल्हाप्रमुख रामहरी तिकांडे , सुरेश भिसे, संतोष वाकचौरे , भाऊसाहेब गोर्डे, उपस्थित होते.