राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यातील 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार 02 डिसेंबर 2025 रोजी 263 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान झाले. पण, 23 ठिकाणची निवडणूक काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता या ठिकाणी उद्या म्हणजेत 20 डिंसेबरला मतदान पार पडणार आहे. त्यानंतर सर्व संबंधित ठिकाणी 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे.
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणूकीसाठी 2 डिसेंबरला मतदान पार पडले आहे. मात्र 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणूका काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता राज्यातील 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांसाठी; तसेच विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 143 सदस्यपदांच्या जागांसाठी उद्या मतदान पार पडणार आहे. त्यानंतर 2 डिसेंबरसह 20 तारखेला होणाऱ्या मतदानाचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालावर असणार आहे.
उद्या म्हणजेच 21 तारखेला ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा या ठिकाणी मतदान पार पडणार आहे. त्याचबरोबर पुण्यातील बारामती, फुरसुंगी-उरुळी देवाची, सोलापूरातील अनगर, मंगळवेढा, साताऱ्यातील महाबळेश्वर, फलटण येथेही मतदान पार पडणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री, नांदेडमधील मुखेड, धर्माबाद, लातूरमधील निलंगा, रेणापूर, हिंगोलीतील वसमत, अमरावतीतील अंजनगावसूर्जी, अकोला जिल्ह्यातील बाळापूर, यवतमाळमधील यवतमाळ, वाशिममधील वाशिम, बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा, वर्ध्यातील देवळी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथे मतदान पार पडणार आहे.














