पुण्याच्या मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीवर असल्याचं चित्र आहे. एकूण पाच जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली आघाडी कायम ठेवली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर, मतदारांनी या निकालाच्या माध्यमातून खरी श्रद्धांजली अर्पण केली. सध्या मावळमध्ये हेच चित्र पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या पाचही जागांवर आघाडी मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी “अमर रहे, अमर रहे, अजित पवार अमर रहे” अशा घोषणा देत जल्लोष केला आहे.
Zilla Parishad Election Result 2026: “अमर रहे, अमर रहे, अजित पवार अमर रहे” घोषणा देत कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष!












