राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं. आज सकाळी ९ च्या सुमारास बारामती जवळ एक शेतात त्याचं विमान क्रॅश होऊन मोठा स्फोट झाला. त्यामध्ये अजित पवार यांच्यासह विमानातील सहाही लोकांचा मृत्यू झाला. कमी दृश्यमानता असल्यामुळे हा भयानक अपघात झाल्याचे बोलले जात आहे. विमान खाली कोसळून मोठा स्फोट झाला. संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणासाठी धक्का असून अजित दादांचे चाहते, कार्यकर्ते, सर्व बारामतीकर हे शोकाकुल आहेत. पवार कुटुंबियांच्या दु:खाला तर पारावार उरलेला नाही. मात्र अजित दादांच्या जाण्याचा बॉलिवूडलाही मोठा धक्का बसला असून कंगना रानौत पासून ते रितेश देशमुखपर्यंत अनेकांनी अजित वार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रानौत यांनी अजित पवार यांच्या मृत्यूबद्दल व्यक्त केला शोक.
अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रानौत यांनी अजित पवार यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. संसदेत पत्रकारांनी त्यांना वेढले होते. अजित पवारांच्या मृत्यूबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्या खूप हैराण दिसत होत्या. पुढे त्या म्हणाल्या, ” हे खूप भयानक आहे. ही भयानक बातमी आहे. मला माफ करा,याबद्दल मला काहीही बोलायचे नाही.”. एकंदरच त्या बोलण्याच्या मनस्थितीत नव्हत्या असं दिसतं होतं. नंतर त्यांनी सोशल मीडियावरून पोस्ट करत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.
अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियावर पोस्ट करत अजित पवार यांना आदरंजाली वाहिली
अभिनेता रितेश देशमुख यानेही सोशल मीडियावर पोस्ट करत अजित पवार यांना आदरंजाली वाहिली. ‘एका दुःखद अपघातात आपण अजित दादा गमावल्याचे ऐकून खूप दुःख झाले. अजित दादा हे महाराष्ट्रातील सर्वात डायनॅमिक नेत्यांपैकी एक होते, त्यांन खराब कामगिरी अजिबात आवडायची नाही. ते नेहमीच त्यांच्या सभोवतालच्या लोकांना चांगले काम करण्यास प्रेरित करायचे. मनातलं बोलायालला ते कधीच संकोचायचे नाहीत. त्यांचा हजरजबाबीपणा उत्तम होता. आणि संपूर्ण राज्यातील लोकांचं त्यांच्यावर निरतिशय प्रेम होतं. त्यांच्या अकस्मात निधनाने मोठं नुकसान झालं आहे. मला त्यांना अनेक वेळा भेटण्याची संधी मिळाली आणि त्यांनी माझ्यावर दाखवलेला दयाळूपणा मी नेहमीच लक्षात ठेवेन. पवार कुटुंब, त्यांच्या प्रियजनांना आणि त्यांच्या लाखो समर्थकांना माझ्या मनापासून संवेदना.” असं रितेशने म्हटलं.
Deeply shocked and terribly heartbroken to learn that we have lost Ajit Dada in a tragic accident. One of Maharashtra’s most dynamic leaders, he had zero tolerance for non-performance and constantly pushed and inspired those around him to excel. He never minced his words, his wit… pic.twitter.com/nGQ3M1xf0Z
— Riteish Deshmukh (@Riteishd) January 28, 2026
अजय देवगणची पोस्ट
अभिनेता अजय देवगण यानेही त्याच्या पोस्टमधून दु:ख व्यक्त केलं. “माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार जी यांच्या दुःखद निधनाने धक्का बसला आणि दुःख झाले. त्यांच्या कुटुंबियांना, प्रियजनांना आणि या मोठ्या नुकसानाने प्रभावित झालेल्या सर्वांप्रती माझी मनापासून संवेदना.” असं त्याने पोस्टमध्ये नमूद केलं.
Shocked and saddened by the tragic passing of Hon. Deputy CM Ajit Pawar ji. My heartfelt condolences to his family, loved ones and all those affected by this immense loss. Om Shanti 🙏🏻
— Ajay Devgn (@ajaydevgn) January 28, 2026













