मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि नागपूरसह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान पार पडले, त्यानंतर आज म्हणजे १६ जानेवारी रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या नागपुरात भाजप यशाच्या दिशेने वाटचाल करत आहे. नागपूरमध्ये भाजप अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे. भाजपचे ४९ उमेदवार आघाडीवर आहेत. तर शिवसेना, मनसे आणि ठाकरे गटाने अद्याप स्वतःचे खाते देखील उघडलेले नाही. तर काँग्रेसचे सहा उमेदवार आघाडीवर आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसह राज्यातील २ हजार ८६९ प्रभागांसाठी मतदान पार पडले आहे. मुंबईतील १७०० उमेदवारांसह राज्यभरात १५,९३१ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.














