भाजपचे तामिळनाडू मधील नेते के अनामलाई आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील वाद वाढत चाललेला दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात के अनामलाई यांनी मुंबईत येऊन भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराला हजेरी लावली. त्यावेळी बोलताना, अनामलाई यांनी मुंबईबाबत बोलताना बॉम्बे महाराष्ट्रातलं शहर नाही तर आंतरराष्ट्रीय शहर आहे. त्यावरून रविवारी शिवाजी पार्क येथे झालेल्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. आता याच मुद्द्यावर अनामलाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुंबई शहर हे केवळ महाराष्ट्रापुरते सिमीत नसून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हटल्याने महाराष्ट्रातील लोकांचे योगदान कुठेही नाकारलेले नाही, असेही अनामलाई म्हणाले.
भाजपचे तामिळनाडू मधील नेते के अनामलाई यांनी गेल्या आठवड्यात मुंबईत येऊन भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराला हजेरी लावली. त्यावेळी बोलताना, अनामलाई यांनी मुंबईबाबत बोलताना Bombay is not Maharashtra City, बॉम्बे महाराष्ट्रातलं शहर नाही तर आंतरराष्ट्रीय शहर आहे असा उल्लेख केला होता. त्यावरून रविवारी शिवाजी पार्क येथे झालेल्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. आता याच मुद्द्यावर अनामलाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुंबई शहर हे केवळ महाराष्ट्रापुरते सिमीत नसून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हटल्याने महाराष्ट्रातील लोकांचे योगदान कुठेही नाकारलेले नाही, असेही अनामलाई म्हणाले.
“मला धमकी देणारे आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे कोण आहेत? मी एका शेतकऱ्याचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. त्या लोकांनी (ठाकरे बंधू) फक्त मला शिवीगाळ करण्यासाठी सभा बोलवली होती. मलाही माहिती नव्हते की मी त्यांच्यासाठी एवढा महत्त्वाचा बनलो आहे. कुणीतरी असं लिहिलं आहे की मी मुंबईत आलो तर माझे पाय छाटून टाकतील. अशा लोकांना मी सांगतो की, मी मुंबईत येणार आहे.. माझे पाय छाटण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करून पाहा. धमक्यांना घाबरणारा असतो तर मी माझ्या गावात लपून बसलो असतो. जर मी म्हणत असेन की कामराज हे भारताचे सर्वोत्तम नेत्यांपैकी एक आहेत. तर याचा अर्थ असा होतो का की ते तमिळ राहिले नाहीत? त्याचप्रमाणे मी जर म्हणतोय की मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. तर त्याचा अर्थ असा होतो का की महाराष्ट्रातील लोकांनी मुंबई उभी केलेली नाही?” अशा शब्दांत अनामलाई यांनी राज यांच्या टीकेला उत्तर दिले.














