मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही सातत्याने भेट होत आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी अचानक मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. नुकतेच राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट देत मुख्यमंत्री फडणवीसांनी गणरायाचे दर्शन घेतले होते. आता, राज ठाकरे यांनी सपत्नीक वर्षा निवासस्थानी भेट देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरातील गणपती बाप्पांचे दर्शन घेतले.
दरम्यान, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची 12 जून रोजी वांद्र येथील ताज लँडस् हॉटेलमध्ये देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली होती. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसे युतीची चर्चा सुरु असताना फडणवीस आणि राज ठाकरेंच्या गाठीभेटी वाढल्या असून 15 दिवसांतच ही त्यांची तिसऱ्यांदा भेट आहे. मुंबईत बेस्ट पतसंस्थेच्या निवडणूक निकालाच्या दुसऱ्याचदिवशी 21 ऑगस्ट रोजी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना अचानक भेटायला गेले होते, तेव्हा मुंबई शहरातील काही महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा केल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.














