राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारी, शनिवारी, मतदान पार पडलं. त्याची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी 7 हजार 438 उमेदवार रिंगणात होते. एकूण 25 हजार मतदान केंद्रांवर शनिवारी मतदान पार पडले. राज्यात एकूण 66.28 टक्के मतदान झाले असल्याचं राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीत समोर आलं आहे. आज 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली असून, पहिले कल हाती आले आहेत.
संभाजीनगर सोयगाव तालुक्यात भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांची मुलगी माहीन इद्रिस मुलतानी फर्दापूर जिल्हा परिषद गटातून विजयी झाल्या आहेत.
तर, कोल्हापुरात काँग्रेसने आतापर्यंत 12 जागावर विजय मिळवला असून, दुसऱ्या क्रमांकवर राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागा मिळवल्या. तसेच, भाजप 7,शिवसेना 6, जनसुराज्यने 4 जागा मिळवल्या आहेत तर ठाकरे गट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रत्येकी एक जागा मिळवली.















