लातूर शहर महानगरपालिकेच्या ७० जागांसाठी १५ जानेवारी रोजी झालेल्या मतदानाचे निकाल आज (शुक्रवारी) जाहीर होत आहेत. मतमोजणी सकाळी १० वाजेपासून सुरू झाली असून, प्रारंभिक ट्रेंड्स आणि अपडेट्सनुसार निकालांचे लाइव्ह अपडेट्स येत आहेत. सुरुवातीच्या कलानुसार भाजपने १७ जागांवर आघाडी घेतली आहे तर कॉंग्रेसने ७ जांगावर पुढे आहे.
सरासरी ६०% मतदान झाले होते, ज्यात मुख्य लढत काँग्रेस-वंचित बहुजन आघाडी युती, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात होती. गेल्या वेळी (२०१७) भाजपने ३६ जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसने ३२ जागा मिळवल्या होत्या. यंदा तिरंगी लढत असल्याने बहुमत कोणाकडे जाईल, हे लवकरच स्पष्ट होईल.
मुख्य मुद्दे:
एकूण जागा: ७० (बहुमतासाठी ३६ जागा आवश्यक)
उमेदवारांची संख्या: ३६९
प्रमुख पक्षांची स्थिती:
काँग्रेस: ६५ जागा लढवल्या (वंचित बहुजन आघाडीसोबत युती, ५ जागा)
भाजप: सर्व ७० जागांवर उमेदवार
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): ६० जागांवर














